Advertisement

Responsive Advertisement

देवस्थानने जपलेली परंपरा, शिस्त आणि आपुलकी हेच या वटवृक्षाचे खरे सामर्थ्य : डॉ. शैलेंद्र देवळाणकर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी घेतले श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचे दर्शन

चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या हस्ते देवळाणकर कुटुंबीयांचा सत्कार

 अक्कलकोट - प्रतिनिधी : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे जागृत मूलस्थान आहे. या देवस्थानने वर्षानुवर्षे जपलेली परंपरा, शिस्त आणि भाविकांप्रती असलेली आपुलकी हेच या वटवृक्षाचे खरे सामर्थ्य आहे, असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक तथा उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी काढले.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी नुकतीच आपल्या पत्नी रेणुका देवळाणकर व कुटुंबीयांसमवेत श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या हस्ते डॉ. देवळाणकर व त्यांच्या कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. देवळाणकर म्हणाले की, अक्कलकोटला आल्याशिवाय मनाला खऱ्या अर्थाने समाधान मिळत नाही. येथे येणारा प्रत्येक भाविक हा स्वामींचाच पाहुणा आहे, ही भावना देवस्थानच्या प्रत्येक कामातून दिसून येते. चेअरमन महेश मालक इंगळे आणि त्यांची संपूर्ण टीम भाविकांची सेवा हीच स्वामी सेवा मानून कार्यरत आहे, ही बाब विशेष कौतुकास्पद आहे. यावेळी त्यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छाही दिल्या.

स्वामी दर्शनानंतर डॉ. देवळाणकर व त्यांच्या कुटुंबीयांनी मंदिर परिसरातील विविध व्यवस्थांची पाहणी केली. यामध्ये भक्तनिवास, दर्शन व्यवस्था आणि परिसरातील स्वच्छतेची माहिती घेत त्यांनी देवस्थानच्या कामकाजाबद्दल विशेष समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी प्रथमेश मालक इंगळे, प्रा. शिवशरण अचलेर, लक्ष्मी अचलेर, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, विपुल जाधव यांच्यासह अनेक भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानच्या अतिथी कक्षात डॉ. शैलेंद्र देवळाणकर व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करताना चेअरमन महेश मालक इंगळे, प्रा. शिवशरण अचलेर व लक्ष्मी अचलेर.

Post a Comment

0 Comments