सोलापूर - प्रतिनिधी : ब्रिलियंट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा ब्रिलियंट टाइम्स न्यूज चॅनेलचे संपादक इम्तियाज अक्कलकोटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर रेल्वे स्टेशनवरील तिकीट घर येथे प्रवाशांच्या सोयीसाठी भिंतीवरील आरसा भेट देण्यात आला. तसेच प्रवाशांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
या उपक्रमाचे उद्घाटन रेल्वे प्रशासनाचे कृष्ण गोपालदास (टी.टी.) आणि ओपीटी रिझवान तुकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इम्तियाज अक्कलकोटकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, राजाभाऊ जाधव, श्रीनिवास बनसोडे, मल्लिकार्जुन हेगडे, रेणुका सुतार, शफिक शेख, सुहास जोशी, अब्दुल शेख, मोहम्मद वजीफा, बी.एस. शेख, मुस्ताक लालकोट, सादिक सौदागर यांच्यासह ब्रिलियंट ग्रुपचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता प्रवाशांच्या उपयोगी पडणारा सामाजिक उपक्रम राबवून इम्तियाज अक्कलकोटकर यांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली.
0 Comments