Advertisement

Responsive Advertisement

शौर्य आणि बुद्धिमत्तेचा गौरव; सोलापुरात शिवप्रताप दिन उत्साहात साजरा

सोलापूर - प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य, धाडस आणि मुत्सद्देगिरीचे प्रतीक असलेला शिवप्रताप दिन संभाजी ब्रिगेडच्या वतीने होटगी रोडवरील शिवप्रताप चौकात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि मानाचा मुजरा करून करण्यात आली. यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी आदिलशाही सरदार अफजलखानाचा केलेला वध, स्वराज्याच्या रक्षणासाठी दाखवलेले अतुलनीय धैर्य, रणकौशल्य आणि गनिमी काव्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि शौर्याच्या जोरावर स्वराज्याचे रक्षण केले. त्यांच्या पराक्रमातून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी तसेच शिवरायांचे विचार, स्वाभिमान आणि स्वराज्याची संकल्पना समाजात रुजवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास आणि विचारांचा वारसा सदैव जिवंत ठेवण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.

या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शेळके, शहराध्यक्ष वैभव गायकवाड, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीनल दास, जिल्हा कार्याध्यक्षा मनीषा कोळी यांच्यासह तेजस शेळके, विश्वजित गंभीरे, लक्ष्मण गंभीरे, पिंटू कोळी, श्रवण साळुंखे, महेश गुब्याड, गजानन शिंदे, आरुष शेळके, सिद्धराम घोडके, नागेश ख्याड, नागेश शिंदे, सनी पटू, पीटर पाटोळे, अमोल शिर्के, अभिजित भोसले, बसवेश्वर पाटील, कपिल नरूटे, रमेश भंडारे, स्वप्नील गायकवाड, निरंजन प्रसाद, सौरव जन्मा, राम राठोड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments