सोलापूर प्रतिनिधी : आढीव येथील शेतकरीपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. दिनकर दाजी चव्हाण यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत ५१ हजार १११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे सुपूर्द केला.
दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात मिळावा, या सामाजिक भावनेतून दिनकर दाजी चव्हाण यांनी यापूर्वीही अनेक वेळा राष्ट्रीयीकृत बँकेचा डी.डी. काढून विविध प्रकारे मदत केली आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानातून दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांप्रती असलेली आस्था आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित होत आहे.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिनकर दाजी चव्हाण यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांच्या योगदानाबद्दल अभिनंदन केले. यावेळी नारळ व्यापारी अशोक देवकर, आमदार अभिजीत आबा पाटील यांचे स्वीय सहाय्यक विक्रम दास तसेच सोमनाथ गोरे उपस्थित होते.
दिनकर दाजी चव्हाण यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत समाजातील इतर घटकांनीही पुढे येऊन गरजू शेतकरी व नागरिकांना मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 Comments