Advertisement

Responsive Advertisement

मंद्रूप पोलिसांचा सीना नदीत मध्यरात्री धाडसी कारवाई !अवैध वाळू उपशावर मोठा हातोडा; १० आरोपींवर गुन्हा, ७ अटकेत तर ३ फरार

दक्षिण सोलापूर (प्रतिनिधी) : सीना नदीपात्रात बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर मंद्रूप पोलिसांनी मोठी कारवाई केली. परिविक्षाधीन पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या पथकाने मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास राजूर-सिंदखेड दरम्यान सीना नदीपात्रात धाड टाकली. इरप्पा रणखांबे यांच्या शेताजवळ सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत पोलिसांनी तब्बल २२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये १५ लाख रुपये किमतीचे तीन टेम्पो, ४ लाख रुपयांची स्विफ्ट डिझायर कार, १ लाख ७० हजार रुपये किमतीच्या दुचाकी आणि २ लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन यांचा समावेश आहे.

या प्रकरणी एकूण १० आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ३ आरोपी फरार आहेत. अर्जुन नाईकवाडी, रोहित पवार, सागर पवार, हणमंतु कुंभार, शिवानंद व्हनमाने, गणेश पाटील, विजय रणखांबे यांच्यासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमा गायकवाड, मनोज कनपुवडीयार आणि सोमा शिवगुंडे हे तिघे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रस्ता नसतानाही तब्बल तीन दिवस सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. मध्यरात्री करण्यात आलेल्या या धाडसी कारवाईमुळे सीना नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश शिंदे, रविंद्र चव्हाण, अशपाक मियाँवाले, बिराण्णा वाघमोडे, चेतन गवंडी आणि गणेश पाटील यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments