रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो आणि मुख्य टपाल कार्यालयाचा संयुक्त उपक्रम
सोलापूर - प्रतिनिधी : भारतीय टपाल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त सोलापूर मुख्य टपाल कार्यालयात गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो आणि सोलापूर मुख्य टपाल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
पत्रे, पार्सल आणि विविध टपाल सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात टपाल कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ऊन-पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी, टपाल कार्यालयांतील कर्मचारी आणि टपाल वितरकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रोचे अध्यक्ष रोटे. दिनेश काटकर, सचिव रोटे. कल्लाप्पा गुरव, तसेच सदस्य रोटे. श्रीकांत अंजुटगी, रोटे. महेश नक्का, रोटे. विश्वनाथ कोळी आणि रोटे. अमित कामतकर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर मुख्य टपाल कार्यालयाचे वरिष्ठ टपाल अधीक्षक काळे सर आणि वरिष्ठ प्रबंधक उपस्थित होते.
या उपक्रमाला भावसार व्हिजन, सोलापूरचे आशिष जवळकर, निशिकांत पुकाळे, रमेश माळवे, मनोज क्षीरसागर, विशाल खमितकर आणि हर्षल माळवदकर यांनी सहकार्य केले.
‘एक टपाल जाळे, अनंत शक्यता’
‘One Postal Network, Infinite Possibilities’ अर्थात ‘एक टपाल जाळे, अनंत शक्यता’ या संकल्पनेतून टपाल विभागाची विश्वासार्हता, व्यापकता आणि आधुनिक सेवांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. सार्वजनिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करणे, ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून
देण्यात आला.
टपाल कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपणारा ठरला. रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो आणि सोलापूर मुख्य टपाल कार्यालय यांच्या पुढाकाराचे यावेळी कौतुक करण्यात आले.
0 Comments