Advertisement

Responsive Advertisement

आदर्श नगरात श्री शक्ती नवरात्रोत्सवाचा भक्तिमय सोहळा !महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते तिरुपती बालाजीच्या भव्य देखाव्याचे उद्घाटन; देवीच्या पूजनाने परिसरात उत्साह

सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर शहरातील आदर्श नगर येथे श्री शक्ती नवरात्र उत्सव तरुण मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त देवी मातेचे विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली. महापौर विनायक कोंड्याल आणि धनश्रीताई कोंड्याल यांच्या हस्ते देवीचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.
या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या तिरुपती बालाजी देवस्थानच्या भव्य देखाव्याचे उद्घाटन महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले. हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी माजी महापौर कांचना यन्नम आणि रमेश यन्नम यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंडळाचे अध्यक्ष सनी शिंदे, उपाध्यक्ष सोमनाथ माळी, सचिव दीपक सोमवंशी, खजिनदार संतोष गायकवाड, मिरवणूक प्रमुख सोनू बेत, मंडळाचे आधारस्तंभ बाळासाहेब माने, सल्लागार संतोष गायकवाड, तसेच विजय शिंदे, मल्लेशम आडम आणि सदानंद कोडम आदी उपस्थित होते.
धार्मिक परंपरेतून सामाजिक एकोप्याचा संदेश

श्री शक्ती नवरात्र उत्सव तरुण मंडळाने साकारलेल्या भव्य देखाव्यामुळे आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे आदर्श नगर परिसरातील उत्साहात भर पडली आहे. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरांचे जतन करण्याबरोबरच सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वृद्धिंगत होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

देवी मातेचे पूजन, आरती आणि तिरुपती बालाजीच्या भव्य देखाव्यामुळे आदर्श नगरमधील नवरात्रोत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे.

Post a Comment

0 Comments