सोलापूर - प्रतिनिधी : विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या पावन पर्वानिमित्त सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल व धनश्रीताई कोंड्याल यांनी पार्क चौकातील ऐतिहासिक शमी वृक्षाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शमी वृक्षाचे विधिवत पूजन करून सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली. याप्रसंगी पृथ्वीराज कोंड्याल उपस्थित होते.
सोलापूर शहरात विजयादशमीच्या दिवशी पार्क चौकातील शमी वृक्षाच्या दर्शनाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. दसऱ्यानिमित्त शहरातील विविध देवी मंदिरांतून निघणाऱ्या देवीभक्तांच्या मिरवणुका पार्क चौकात येतात. येथे शमी वृक्षाचे दर्शन घेऊन सीमोल्लंघनाची परंपरा श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पाडली जाते. त्यामुळे दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी पार्क चौक परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
विजयादशमी हा विजय, शौर्य, मांगल्य आणि नव्या संकल्पांचा संदेश देणारा सण आहे. शमी वृक्षाचे पूजन करून सीमोल्लंघन करण्याची परंपरा सोलापूरकर आजही श्रद्धेने जपत आहेत. या परंपरेतून शहराचा समृद्ध धार्मिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडते.
0 Comments