Advertisement

Responsive Advertisement

शहराच्या विकासात पत्रकारांची भूमिका मोलाची : महापौर विनायक कोंड्याल

पत्रकारांच्या गृहप्रकल्पासाठी महापालिकेचे सर्वतोपरी सहकार्य; सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

सोलापूर (प्रतिनिधी) : लोकशाहीमध्ये पत्रकारितेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, पत्रकार समाजातील विविध प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. शहराच्या सर्वांगीण विकासातही पत्रकारांची भूमिका मोलाची आहे. पत्रकारांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी महापालिका सकारात्मक दृष्टिकोन ठेवेल. तसेच पत्रकारांच्या गृहप्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते सोमवारी महापौर कार्यालयात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर आणि नगरसेवक मनीष केत यांची प्रमुख उपस्थिती होती.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी चौदाव्यांदा निवड झाल्याबद्दल विक्रम खेलबुडे यांच्यासह संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यामध्ये सरचिटणीस आफताब शेख, खजिनदार विजय गायकवाड, उपाध्यक्ष अविनाश गायकवाड व नितीन पात्रे, चिटणीस रतन (आप्पा) बनसोडे व प्रीतम पंडित, सहचिटणीस रोहित थळवे, कार्यकारिणी सदस्य रवी ढोबळे, श्रीनिवास मावनूर, गौतम गायकवाड, विक्रांत कालेकर, सचिन जाधव, यशवंत गुरव, नितीन कटके, मुजम्मील शाहनूरकर, सागर इप्पलपल्ली आणि महेश कुलकर्णी, तसेच सल्लागार प्रशांत जोशी यांचा समावेश होता.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सोलापूर शहराच्या विकासासाठी पत्रकारांनी सकारात्मक भूमिका बजावण्याचे आवाहन केले. पत्रकारांसाठी उभारण्यात येणारा गृहप्रकल्प सर्व आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त व्हावा, यासाठी महापालिकेच्या वतीने सहकार्याची भूमिका घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार किरण बनसोडे यांनी केले, तर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments