Advertisement

Responsive Advertisement

पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराकडून अक्षय बबलाद यांचा भव्य सत्कार


कर्तव्यनिष्ठ पत्रकारितेचा गौरव; पत्रकार, सामाजिक व आर.टी.आय कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती.

सोलापूर (प्रतिनिधी) : दैनिक लोकशाही मतदारचे युवा संपादक अक्षय'जी बबलाद यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीने सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद येथील बागेत दुपारी १.३० वाजता भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात अक्षय बबलाद यांचा शाल, मानाची टोपी व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.

पत्रकारिता क्षेत्रात कर्तव्यनिष्ठपणे काम करताना समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, जनहिताच्या विषयांना प्राधान्य देणे तसेच शिस्तबद्ध कार्यपद्धतीने पत्रकारितेची जबाबदारी पार पाडल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी अक्षय बबलाद यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

हा सत्कार सोहळा तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने तसेच अप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. समाजहित, पत्रकारिता आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव व्हावा, या उद्देशाने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मान्यवरांची मोठी उपस्थिती
कार्यक्रमास मा. अप्पासाहेब लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार लतीफ नदाफ, गिरमल्ला गुरव, अनिल शिराळकर, सिद्धाराम नंदर्गी, सलाउद्दीन शेख, नागेश पासकंटी, अस्लम नदाफ, अमोल कुलकर्णी, राजाभाऊ बेळ्ळेनवरू, वैजिनाथ बिराजदार, योगेश कल्याणकर, अकबर शेख, डॉ. राम हुंडारे, आर. डी. जाधव, डॉ. कीर्तीपाल गायकवाड, संगप्पा कांबळे, निम्मल सर, जहीर नदाफ, मोहन थंळगे, सोहेल जहागीरदार, यासिन शेख, नागनाथ गणप्पा, नबी तांबोळी, भिमा वावरे, शाहीद शेख, अशोक ढोणे, इम्तियाज अक्कलकोटकर, विजयकुमार उघडे यांच्यासह अनेक पत्रकार बांधव, आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अक्षय बबलाद यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनतेच्या प्रश्नांना निर्भीडपणे मांडणारी आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारी पत्रकारिता ही लोकशाहीची महत्त्वाची ताकद आहे, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. उपस्थित पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, आर.टी.आय कार्यकर्ते व मित्रपरिवाराच्या वतीने सत्कारमूर्ती अक्षय बबलाद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Post a Comment

0 Comments