Advertisement

Responsive Advertisement

खंदक बाग येथे हिंदवी परिवारातर्फे शिवप्रबोधन कार्यक्रम उत्साहात


डॉ. शिवरत्न शेटे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर - प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, इतिहास आणि स्वराज्याची संकल्पना नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने खंदक बाग येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवप्रबोधन कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमास सोलापूर शहराचे महापौर विनायक कोंड्याल, आमदार सुभाष बापू देशमुख, माजी आमदार नरसिंग मेंगजी, उपमहापौर ज्ञानेश्वरी ताई देवकर, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, तसेच बाळासाहेब वाघमारे, नगरसेविका सुनीता कामठी, नगरसेवक बिज्जू अण्णा प्रधाने, नगरसेवक सात्विक बडवे, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, प्रशांत बडवे, अविनाश महागावकर, महेश धाराशिवकर, उत्तर बरडे-बचूटे, शहाजी भाऊ पवार, विनोद भोसले, अक्षय वाकसे, नागेश खरात यांच्यासह हिंदवी परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुशांत धुत्तरगावकर यांनी पुस्तक वाचन केले. त्यानंतर डॉ. शिवरत्न शेटे यांनी शिवप्रबोधनातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, स्वराज्य निर्मितीमागील भूमिका, त्यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व आणि समाजहिताचे विचार यावर सविस्तर विवेचन केले. शिवरायांचा इतिहास हा केवळ गौरवाचा विषय नसून त्यांच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा आदर्श आजच्या पिढीने आत्मसात करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून स्वराज्याची उभारणी केली. स्वाभिमान, शिस्त, संघटन, धैर्य, न्याय, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिष्ठा ही शिवविचारांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आजच्या युवकांनी या मूल्यांचा अंगीकार करून समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

शिवप्रबोधन कार्यक्रमामुळे खंदक बाग परिसरात शिवविचारांचा जागर झाला. युवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. शिवरत्न शेटे यांचे प्रबोधन ऐकले. हिंदवी परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला.

Post a Comment

0 Comments