सोलापूर - प्रतिनिधी : श्री मंगलदास क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, मजरेवाडी संचलित श्री मंगलदास मूकबधिर मराठी निवासी शाळा, सोलापूर येथे एम.के. युथ फाउंडेशनचे आधारस्तंभ महेंद्र कांबळे यांचा ५० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेतील मूकबधिर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महेंद्र कांबळे यांनी एम.के. युथ फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांना बळ देत समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात दिला आहे. सामाजिक बांधिलकी, सेवाभावी वृत्ती आणि माणुसकी जपणे ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.
मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे क्षण वाटले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासोबतच समाजात आपुलकी, माणुसकी आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होते.
या प्रसंगी संस्थेचे सचिव अरुण धोत्रे व उमाप यांनी महेंद्र कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच एम.के. युथ फाउंडेशनचे संस्थापक वीरेंद्र कांबळे, सचिव शैलेंद्र कांबळे, केशव कोळी यांच्यासह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विजयकुमार लोंढे यांनी केले.
सामाजिक कार्याचा ध्यास, माणुसकीचा आधार आणि सेवाभावी वृत्तीचा वारसा जपणाऱ्या महेंद्र कांबळे यांचा ५० वा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या सहवासात अविस्मरणीय ठरला. यावेळी उपस्थितांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी सामाजिक कार्यासाठी भरभरून यश लाभावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
0 Comments