Advertisement

Responsive Advertisement

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनससह मिठाईचे वाटप ! एक महिन्याच्या वेतनाइतका बोनस देऊन सेवेकऱ्यांची दिवाळी केली गोड; मंदिर समितीचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या हस्ते उपक्रम

अक्कलकोट - प्रतिनिधी :  श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कर्मचारी व सेवेकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी देवस्थानच्या वतीने एक महिन्याच्या वेतनाइतका बोनस (दिवाळी स्वामी प्रसाद) देण्यात आला. तसेच विबोधी फाउंडेशनच्या वतीने उटण्याची पाकिटे, तर मुंबई येथील स्वामीभक्त ॲड. मधुकर वैद्य व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले. मंदिर समितीचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना ॲड. मधुकर वैद्य म्हणाले की, श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सीम भक्त असून, स्वामींच्या सेवेत आपले जीवन व्यतीत करणाऱ्या सेवेकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने देवस्थानच्या वतीने बोनस आणि आमच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सेवेकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवता आल्याचे समाधान आम्हाला आणि देवस्थान समितीला आहे.

या उपक्रमाचा सर्व कर्मचारी व सेवेकऱ्यांनी लाभ घेतला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा. शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, जयप्रकाश तोळणूरे, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, संजय पवार, महेश मस्कले, श्रीशैल गवंडी आदी उपस्थित होते.

फोटो ओळ : श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस, स्वामी प्रसाद व मिठाईचे वाटप करताना चेअरमन महेश मालक इंगळे, ॲड. मधुकर वैद्य, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी व अन्य मान्यवर.

Post a Comment

0 Comments