Advertisement

Responsive Advertisement

पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर यांच्या हस्ते ‘दैनिक लोकशाही मतदार’च्या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन

सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर शहराचे पोलीस उपायुक्त (DCP) प्रितम यावलकर यांच्या हस्ते दैनिक लोकशाही मतदारच्या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न झाले.

गेल्या तीन वर्षांपासून दैनिक लोकशाही मतदार वृत्तपत्राने आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून सोलापूर शहर, तालुका, जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवले आहे. विश्वासार्ह आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून वृत्तपत्राने अल्पावधीतच वाचकांचा विश्वास संपादन केला आहे.

सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सहकाऱ्यांच्या बळावर दैनिक लोकशाही मतदारने आजपर्यंत दमदार वाटचाल केली आहे. वृत्तपत्र हे केवळ माहिती देण्याचे माध्यम नसून सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रभावी साधन आहे, ही भूमिका ठेवून वृत्तपत्राने नेहमीच सामाजिक प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.

वंचित, पीडित, अन्यायग्रस्त आणि अत्याचारग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत त्यांच्या समस्या प्रशासन दरबारी मांडून न्याय मिळवून देण्यासाठी वृत्तपत्राने पुढाकार घेतला आहे. दर्जेदार वृत्तमांडणी, सडेतोड बातम्या आणि सकारात्मक लेखनाच्या माध्यमातून दैनिक लोकशाही मतदारने आपला स्वतंत्र वाचकवर्ग निर्माण केला आहे.

यंदा दैनिक लोकशाही मतदारच्या दिवाळी विशेष अंकाचे चौथे वर्ष असून, या अंकाच्या माध्यमातून विविध विषयांवरील लेख, विचार, सामाजिक प्रश्न आणि जनजागृतीपर लिखाण वाचकांसमोर मांडण्यात आले आहे.

या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब लांगोटे, दैनिक लोकशाही मतदारचे मुख्य संपादक अक्षय बबलाद, महाराष्ट्र पोलीस वार्ताचे संपादक अमोल कुलकर्णी, पत्रकार नितीन करजोळे, ॲड.जुबेर नागणसुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments