सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिका अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरस्तरीय शालेय कॅरम स्पर्धा नुकतीच राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे पार पडली.
या स्पर्धेत श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेतील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आरोही रवींद्र निंबाळकर आणि इयत्ता आठवीचा विद्यार्थी ओम दीपक वैद्य यांनी १४ वर्षांखालील गटातील कॅरम स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांची पुणे विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा विभागप्रमुख संजय पंडित, प्रसन्न काटकर व सुभाष उपासे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक राजकुमार काळे, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments