Advertisement

Responsive Advertisement

जोडभावी पेठ पोलिसांची धडक कारवाई; ६ मोटारसायकली हस्तगत, ५ गुन्हे उघडकीस

सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन सहा मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून, जप्त वाहनांची एकूण किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे.

नागेश भीमाशंकर पाटील (वय ३९, रा. चन्नशेट्टी अपार्टमेंट, घोंगडे वस्ती, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी कसा लावला चोरीचा छडा?

जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित आरोपीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला ताब्यात घेतले. पुढील तपासात सहा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.

हस्तगत केलेल्या सहा मोटारसायकली

१) हिरो स्प्लेंडर प्लस MH-13-AM-5204  ₹२०,०००

२) टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल MH-13-EM-4798         ₹५०,०००

३) हिरो स्प्लेंडर MH-13-DA-4273 ₹३०,०००

४) हिरो होंडा स्प्लेंडर MH-13-BC-4826 ₹२०,०००

५) हिरो होंडा स्प्लेंडर MH-13-AY-6960 ₹३०,०००

६) काळ्या रंगाची हिरो होंडा MH-12-BW-9359 ₹३०,०००
     एकूण ६ वाहने — ₹१,८०,०००

पाच गुन्ह्यांचे क्रमांक पुढीलप्रमाणे 

१. गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९२/२०२६
२. गुन्हा रजिस्टर क्रमांक ७६४/२०२६
३. गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९४/२०२६
४. गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९६/२०२६
५. गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९३/२०२६

धार्मिक स्थळांच्या परिसरात वाहनचोरी

सोलापूर शहरातील रूपाभवानी माता मंदिरात दर्शनासाठी विविध भागांतून भाविक येतात. परिसरात सर्व ठिकाणी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने काही नागरिक रस्त्याच्या कडेला मोटारसायकली उभ्या करतात. अशा संधीचा फायदा घेऊन वाहनचोरी होत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा मागोवा काढला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त प्रीतमकुमार यावलकर, सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी आणि पोलीस निरीक्षक अमोल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस हवालदार शिवानंद लोहार, खाजप्पा आरेनवर, सागर सरतापे, शितल शिवशरण, बसवराज स्वामी, स्वप्निल कसगावडे, रोहित शिंदे,अनिता मोरे, सोमनाथ थिटे, किरण जाधव, निलेश मलाबदे, विठ्ठल काळजे, अमित कांबळे, यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

जोडभावी पेठ पोलिसांच्या या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून सहा वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments