सोलापूर – प्रतिनिधी : पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या मतदार यादीत बोगस मतदारांचा समावेश झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी एस. कार्तिकयन यांनी दिला. ते आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी प्रक्रियेदरम्यान मतदार यादीत बोगस मतदारांचा समावेश झाल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित प्रकरणांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणांची तपासणी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. चौकशीत बोगस मतदार नोंदणी झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकयन यांनी स्पष्ट केले.
मतदार यादीची शुद्धता राखणे आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणे, या दृष्टीने प्रशासनाकडून तक्रारींची पडताळणी करण्यात येत आहे.
0 Comments