Advertisement

Responsive Advertisement

करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ३ लाख ७५ हजारांचा चोरीचा ट्रॅक्टर व पाळीचा मोगडा जप्त

करमाळा - प्रतिनिधी : करमाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने धडाकेबाज कामगिरी करत चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर व पाळीचा मोगडा असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून ते २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान वीट, ता. करमाळा येथील शेतकरी विजयकुमार महादेव गाडे (वय ६३) यांच्या मौजे वीट हद्दीतील गट नं. ८१३ मधील पत्र्याच्या शेडमध्ये उभा केलेला सोनालीका कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर चोरीस गेला होता. ट्रॅक्टरचा आर.टी.ओ.नोंदणी
 क्रमांक एम.एच ४५ एफ ८०१९ चेसिस क्रमांक DZYSW259723/3 व इंजिन क्रमांक 310E1131260490F3 असा आहे. ट्रॅक्टरची किंमत ३ लाख ५० हजार रुपये असून, त्याला जोडलेला २५ हजार रुपये किमतीचा पाळीचा मोगडा असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८५३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. त्यामध्ये दिपक रामदास बरडे (वय ३२, रा. चिखलठाण नं. १, ता. करमाळा, जि. सोलापूर, मूळ रा. अमळनेर (भांडाचे), ता. पाटोदा, जि. बीड) आणि आकाश रामदास बरडे (वय २६, रा. अमळनेर (भांडाचे), ता. पाटोदा, जि. बीड) यांचा सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

यानंतर पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी, गणेश शिंदे व योगेश येवले यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेला ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा सोनालीका ट्रॅक्टर आणि २५ हजार रुपये किमतीचा पाळीचा मोगडा, असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हणुमंत जाधव करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. (भा.पो.से.) आणि करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक हणुमंत जाधव, पोलीस नाईक वैभव ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल इसामिया बहिरे, रविराज गटकुळ, अमोल रंदिल, योगेश येवले, अर्जुन गोसावी, गणेश शिंदे तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल जहिरान नाईकवाडी यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments