मंद्रुप : सोलापूर जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी आज मंद्रुप येथील माळी गल्लीमधील मानाचा मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव मंडळास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मंडळाच्या ‘श्री मंद्रुपचा राजा’ गणरायाचे दर्शन घेत पूजा व आरती केली.
गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंडळास भेट देत गणरायाची मनोभावे पूजा केली. त्यांच्या शुभहस्ते मंडळासमोरील प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
गणेशोत्सवासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.
यावेळी मंडळाच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ व ‘श्री मंद्रुपचा राजा’ बाप्पांची प्रतिमा भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सदिच्छा भेटीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या प्रसंगी पंचायत समिती सदस्य श्री. मुगळे साहेब, मंडळाचे अध्यक्ष श्री. उमेश होळकर, श्री. प्रशांत जोडमोटे, शिवराज कालदे, मिथुन मुगळे, सुरेश काका स्वामी, दयानंद ख्याडे, रवी नंदुरे, म्हाळप्पा घाले, शिवराज मुगळे सर, सागर घाले, निरंजन ख्याडे, विनायक ख्याडे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.
पोलीस अधीक्षकांची ही सदिच्छा भेट मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक ठरली. गणेशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम या भेटीतून पाहायला मिळाला.
— मानाचा मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव मंडळ, माळी गल्ली, मंद्रुप
0 Comments