पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीने विधिवत पूजा; पत्रकार व संपादक बांधवांचा रोप व उपरणे देऊन सत्कार
सोलापूर प्रतिनिधी - भारतीय संस्कृतीतील सर्वात लोकप्रिय आणि भक्तिमय उत्सव असलेल्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून सारा न्यूज नेटवर्कचे संपादक डॉ. राम हुंडारे यांच्या स्वगृही दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभत असून, भक्तिमय वातावरणात गणेश पूजन सोहळा संपन्न होत आहे.
आज पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीने डॉ. राम हुंडारे यांच्या स्वगृही श्री गणेशाची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
या प्रसंगी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, साप्ताहिक दिशा दर्शकचे संपादक अमोल कुलकर्णी, साप्ताहिक सोलापूर संघर्षचे गिरमल्ला गुरव, क्राईम न्यूजचे संपादक R. D. जाधव, सामाजिक कार्यकर्ते नितीन करजोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व पत्रकार व संपादक बांधवांचा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक डॉ. राम हुंडारे यांच्या हस्ते रोप व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गणेशोत्सवात साकारण्यात आलेल्या पर्यावरणपूरक देखाव्याबद्दल पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद आणि क्राईम न्यूजचे संपादक R. D. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज अधोरेखित करत अशा उपक्रमांचे कौतुक केले.
भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या गणेश पूजन सोहळ्याने पत्रकार बांधवांमध्ये एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
0 Comments