मोहोळ (प्रतिनिधी): शेटफळ (ता. मोहोळ) येथे नुकत्याच पार पडलेल्या क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर आयोजित तालुकास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धेत मोहोळ येथील 'क्रांतिवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमी'च्या कराटेपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या स्पर्धेत अकॅडमीच्या १९ खेळाडूंनी प्रथम, ८ खेळाडूंनी द्वितीय, तर ४ खेळाडूंनी तृतीय क्रमांक मिळवून ऐतिहासिक विजय संपादन केला.
या स्पर्धेतील १४, १७ व १९ वर्षांखालील वयोगटातील विविध वजनी गटांत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सर्व १९ कराटेपटूंची आगामी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयी खेळाडूंची यादी:
प्रथम क्रमांक (जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड):
हर्षदा वाघमोडे, सिद्धी पांढरे, श्रावणी दळवे, कृष्णाली नरुटे, अनन्या देशमुख, मानसी कोकणे, स्वराली सगरे, आरती ठोंबरे, भक्ती ठोंबरे, उत्कर्ष ठोंबरे, सुप्रीत वाघमोडे, नागेश काळे, ऋषिकेश शेडजाळे, आदर्श सुळे, विराट वाघमोडे, श्रीराज दळवे, संस्कार गायकवाड, दुर्गेश पाटील आणि हर्षवर्धन भोसले.
द्वितीय क्रमांक:
आर्या शिंदे, संस्कृती गायकवाड, रुचिरा मंगरुळे, अथर्व दळवे, उत्कर्ष काळे आणि वेदिका सुतार.
तृतीय क्रमांक:
स्वराज तेली, आली शेख, आर्या ठोंबरे आणि वेदिका दाईंगडे.
या सर्व यशस्वी खेळाडूंना कराटे प्रशिक्षक दशरथ काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अकॅडमीच्या या घवघवीत यशामुळे खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे तालुकाभरातून कौतुक होत असून जिल्हास्तरीय स्पर्धेतील कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
0 Comments