Advertisement

Responsive Advertisement

सोलापुरात ‘प्रहार’ चित्रपटाचा मोफत फर्स्ट डे फर्स्ट शो उत्साहात संपन्न ! ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावरील पहिलाच चित्रपट; वकिलांसह नागरिकांची मोठी उपस्थिती

सोलापूर (प्रतिनिधी) - भारताचे सुप्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित ‘प्रहार’ या चित्रपटाचा मोफत फर्स्ट डे फर्स्ट शो आज शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सोलापुरात उत्साहात पार पडला. सोलापुरातील भागवत कार्निवल येथे सकाळी १२.३० वाजता या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते.

हॉटेल मंत्रालय'चे संचालक सिद्धेश्वर (मालक) सरवदे यांच्या पुढाकारातून आणि सोलापूरकर वकिलांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी उपस्थित वकिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले 
"महाराष्ट्राचे सरकारी वकील उज्ज्वलजी निकम सर यांनी २६/११, २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना शिक्षा लावून फाशी देण्याचं काम केलं आहे. त्या आधारावर हा ‘प्रहार’ चित्रपट बनवलेला आहे. १६ ऑक्टोबरला त्याचं लाँचिंग साठी सर्व वकील चित्रपट गृहात जमले चित्रपटाचे तिकीट मंत्रालय हॉटेलचे संचालक सिद्धेश्वर सरवदे यांच्या वतीने मोफत ठेवण्यात आले होते.

 याप्रसंगी वकिलांनी सांगितले की, हा चित्रपट मूळतः उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित असून एका सरकारी वकिलाच्या जीवनावर काढलेला हा पहिलाच चित्रपट आहे.

Post a Comment

0 Comments