सोलापूर - प्रतिनिधी : फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कारवाई करत मर्डर प्रकरणातील आरोपीला पिस्टलसह अटक केली. ही कारवाई ५४ मीटर रोड ते जानकर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.
पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-१ अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास देशमुख, सपोनि संजय क्षिरसागर, पोसई श्रीकांत पाटोळे व पोसई सतीश बावणे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली.
पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, ५४ मीटर रोड परिसरात एक इसम हातात पिस्टल घेऊन फिरत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक तातडीने ५४ मीटर रोड ते जानकर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दाखल झाले. त्यावेळी संशयित इसम पोलिसांना आढळून आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आढळून आले. आरोपीची ओळख उफरान ऊर्फ पाप्या मुनिर गोलंदाज (वय २६, रा. गवळी वस्ती, देगाव नाका, लक्ष्मी पेठ, सोलापूर) अशी झाली.
या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७५४/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे
आरोपी उफरान ऊर्फ पाप्या गोलंदाज याचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता त्याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
१) विजापूर नाका पोलीस ठाणे : गु.र.नं. ४४७/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), १८९(२), १८९(४), १९१(१), १९१(२), १९१(३), १९०, ३२४(३), ३२४(४), ३५२, ३५१(२), ३५१(३), तसेच शस्त्र अधिनियम कलम ४ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
२) जेलरोड पोलीस ठाणे : गु.र.नं. २६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १३२, १२१(१), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल आहे.
तसेच जेलरोड पोलीस ठाण्याकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १२९(ई)(ग) अन्वये आरोपीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत सपोनि संजय क्षिरसागर, पोसई श्रीकांत पाटोळे, पोसई सतीश बावणे, पोहेकॉ १२१७ परिट, पोलीस कॉन्स्टेबल १६१७ दत्तात्रय कोळवले, पोलीस कॉन्स्टेबल १४५६ कृष्णा बडूरे, पोलीस कॉन्स्टेबल ६०६ सुरज सोनवलकर, पोलीस कॉन्स्टेबल १३३३ अतिश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ४१ विनायक जाधव व पोलीस कॉन्स्टेबल ४३२ दुधाळ यांनी सहभाग घेतला.
फौजदार चावडी पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
0 Comments