23 ते 26 ऑक्टोबरदरम्यान वाहतुकीवर निर्बंध
शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते 26 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सोलापूर शहरातील जुना तुळजापूर नाका ते तुळजापूर शहर या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास बंदी राहणार आहे. मात्र, पोलीस विभागाची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच पोलिसांनी परवानगी दिलेल्या वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.भाविकांना पायी जाताना अडथळे निर्माण होऊ नयेत, तसेच गैरसोय, अपघात आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 33 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश जारी करण्यात
आला आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग जाहीर
वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
१. पुणे महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने — सोलापूर (बाळे गाव)-बार्शी-येरमाळा मार्गे जातील.
2. पुणे महामार्गावरून धाराशिवकडे जाणारी वाहने — सोलापूर (बाळे गाव)-बार्शी-वैराग मार्गे जातील.
3. पुणे महामार्गावरून लातूरकडे जाणारी वाहने — सोलापूर (बाळे गाव)-बार्शी-येडशी-ढोकी-मुरूड मार्गे जातील.
4. सोलापूर किंवा पुणे महामार्गावरून तुळजापूरकडे जाणारी वाहने — हैदराबाद महामार्गावरील सोलापूर (मार्केट यार्ड)-बोरामणी गाव-इटकळ-मंगरूळ पाटी मार्गे जातील.
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
हा आदेश 23 ऑक्टोबर रोजी पहाटे 12.01 वाजल्यापासून 26 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि
पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments