Advertisement

Responsive Advertisement

चेअरमन महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मंदिरातील उपक्रम स्वामी भक्तांच्या सोयीचे – न्यायमूर्ती अश्विन भोबे.






न्यायमूर्ती अश्विन भोबे यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन
प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते न्यायमूर्ती अश्विन भोबे यांचा सत्कार

अक्कलकोट- प्रतिनिधी : दि. २७ सप्टेंबर २०२६ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात साजरे होणारे विविध धार्मिक कार्यक्रम, श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची व्यवस्था, महिला व पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा, भक्तनिवासातील निवास व्यवस्था तसेच परगावाहून दिंडी व पालखी सोहळ्यासह येणाऱ्या भाविकांसाठी करण्यात येणारी विशेष व्यवस्था या सर्व उपक्रमांचे स्वामी सेवक महेश इंगळे सेवाभावाने व्यवस्थापन करत आहेत.

त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासह भाविकांना विविध बाबतीत उत्तम सुविधा उपलब्ध होत आहेत. मंदिरातील ही सर्व व्यवस्था पाहता, चेअरमन महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मंदिरातील उपक्रम हे स्वामी भक्तांच्या सोयीचे असल्याचे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांनी व्यक्त केले.

न्यायमूर्ती अश्विन भोबे यांनी नुकतीच सपत्नीक श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी न्यायमूर्ती अश्विन भोबे यांचा सपत्नीक श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी बोलताना न्यायमूर्ती अश्विन भोबे म्हणाले की, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे आमचे श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थानाच्या सेवेत चेअरमन महेश इंगळे व त्यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांचे योगदान पाहून कौतुक वाटते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्यासमवेत अक्कलकोटचे न्यायाधीश मुकुल कल्याणकर, न्यायालयाचे स्वप्नील मोरे, बाहेरमठ पोलीस उपनिरीक्षक रणवरे यांच्यासह भाविक भक्त उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments