Advertisement

Responsive Advertisement

जय भवानी प्रशालेतील जीर्ण इमारतीची महापौर विनायक कोंड्याल व स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडून पाहणी...

धोकादायक वर्गखोल्यांच्या ठिकाणी नव्याने सहा वर्ग बांधण्याच्या सूचना; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
 
सोलापूर - प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिकेच्या जय भवानी प्रशालेतील शाळा इमारतीची आज महापौर श्री. विनायक कोंड्याल व स्थायी समिती सभापती श्रीमती रंजिता चाकोते, शहर सुधारणा समिती सभापती स्वाती बडगु, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी पाहणी केली. यावेळी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
 
जय भवानी प्रशालेमध्ये कन्नड माध्यम तसेच मराठी माध्यमाच्या शाळा सुरू असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान इमारतीचा काही भाग जीर्ण व धोकादायक झाल्याचे निदर्शनास आले. सदर इमारत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, त्यामुळे संबंधित धोकादायक वर्गखोल्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी दिले.

नव्याने सहा वर्गखोल्या बांधण्याच्या सूचना
 
जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांच्या ठिकाणी नव्याने सहा वर्गखोल्या बांधण्याबाबत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नवीन बांधकामाची कार्यवाही आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरात लवकर सुरू करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
 नवीन बांधकाम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले. शाळेतील धोकादायक भागाची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.
 
मैदानातील वॉल कंपाऊंडबाबतही चर्चा
 
यावेळी जय भवानी प्रशालेच्या लगत असलेले जिमखाण्याची सुद्धा पाहणी केली या ठिकाणी असलेले जिंकणार लवकरच दुरुस्ती करून सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येईल यावेळी मैदानाचीही पाहणी करण्यात आली. मैदानाभोवती आवश्यक असलेल्या वॉल कंपाऊंडच्या बांधकामाबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या तसेच शाळेच्या परिसराच्या संरक्षणाच्या दृष्टीने कंपाऊंड वॉलचे काम आवश्यकतेनुसार करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
 
तसेच शाळेच्या परिसरात टाकण्यात आलेला आजोरा (कचरा/अनावश्यक टाकाऊ साहित्य) लवकरात लवकर हटविण्याचे निर्देश देण्यात आले. शाळा परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि विद्यार्थ्यांसाठी योग्य ठेवण्याबाबत महापौरांनी स्पष्ट सूचना केल्या.
 
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापकांना सूचना
 
महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, **“जय भवानी प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य आहे. शाळेतील जीर्ण व धोकादायक भागाची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार नवीन सहा वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येईल. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही, यासाठी शाळा प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी.”
 
शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी धोकादायक भागात विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या. नवीन बांधकाम व दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याबाबतही संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले.
 
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. संदीप कारंजे, विभागीय अधिकारी श्री. एम. एच बक्षी, उप अभियंता सुनीता हिबारे तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments