Advertisement

Responsive Advertisement

अखंड हिंदुस्थानातील पहिले मानाचे श्री आजोबा गणपती ट्रस्टतर्फे श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठापना



सोलापूर (प्रतिनिधी)- अखंड हिंदुस्थानातील पहिले मानाचे मंडळ म्हणून नावलौकिक असलेल्या श्री आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने आज भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे महापौर तथा प्रथम नागरिक श्री विनायक कोंड्याल व धनश्रीताई कोंड्याल यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची विधिवत पूजा व प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री आजोबा गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि गणरायाच्या जयघोषात हा सोहळा उत्साहात पार पडला. महापौर श्री विनायक कोंड्याल यांनी श्री गणरायाचे दर्शन घेऊन सोलापूर शहराच्या विकासासाठी तसेच शहरातील नागरिकांच्या सुख, समृद्धी, आरोग्य व कल्याणासाठी प्रार्थना केली.यावेळी  महापौर श्री विनायक कोंड्याल म्हणाले की, सोलापूरच्या गणेशोत्सवाला मोठी ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लाभली आहे. श्री आजोबा गणपती ट्रस्टला या परंपरेमध्ये विशेष मानाचे स्थान असून, या मंडळाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याची परंपरा जपली जात आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांमध्ये एकोपा निर्माण करणारा उत्सव व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. श्री गणरायाच्या आशीर्वादाने सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळो, अशी मनोभावे प्रार्थना आहे, असे त्यांनी सांगितले.या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, यांची उपस्थित होती यावेळी महेश देवकर, उपाध्यक्ष काका मेंडके, खजिनदार केदार वनारोटे, चंद्रशेखर कळमणकर, सुरेश हजडे, गुरुनाथ निंबाळे, शिवानंद अडगळे, विश्वनाथ गोयल, राहुल कुमणे, नंदिमठ, सुमित काबणे, समर्थ मंठाळकर तसेच ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.श्री आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक धार्मिक पद्धतीने तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत असून, भाविकांनी मोठ्या संख्येने श्री गणरायाचे दर्शन घेऊन गणेशोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.


✒️ महाराष्ट्र रत्न💎

मुख्य संपादक - अप्पासाहेब लंगोटे 

मो - 9595055050

Post a Comment

0 Comments