सोलापूर - प्रतिनिधी : दिनांक २०/०५/२०२६ रोजी सायंकाळी ०५.४० वा. चे सुमारास सिंहगड कॉलेज ते एम आय टी कॉलेज सव्हिसरोडवर, एम.आय. टी. कॉलेज जवळ, सोलापूर येथे फिर्यादी आयान मोहसीन डोनगांवकर व त्याचे मित्र जिवनकुमार शिवकुमार तोळनुरे, महंमद अनस अबीद खलीफा, खिजर यासीर बागवान, याहीया यासीर बागवान हे बोलत थांबले असताना, अॅक्सेस मोटारसायकल वरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी आपसात संगनमत करून त्यांच्याजवळ येऊन पिस्टलचा धाक दाखवुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महंमद अनस अबीद खलीफा याचे पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम ३,५००/- रू बळजबरीने काढून घेऊन ते मोटार सायकलवरून निघुन गेले होते. सदर बाबत माहीती मिळताच सदर ठिकाणी मा. पोलीस उप आयुक्त सो. श्री. प्रितम यावलकर, मा. सहा. पोलीस आयुक्त सो. श्री अरूण देवकर, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राऊत, पोलीस निरीक्षक/श्री विकास देशमुख यांनी भेट देवुन फौजदार चावडी डी. बी. पथकाचे प्रमुख सपोनि/संजय क्षिरसागर व डी. बी. पथकास सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत योग्य त्या मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.७२६/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३(५), शस्त्र अधिनियम कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महादेव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे सपोनि/क्षिरसागर व पथक यांनी तात्काळ आरोपीताचा शोध सुरु केला. तपासा दरम्यान डी बी पथकाने सदर ठिकाणचे घटनास्थळी आजुबाजुस चौकशी केली. घटनास्थळी सी टी व्ही कॅमेरा उपलब्ध नसल्याने परिसरातील हायवे रोडवरील हॉटले व लॉजेस यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये घटनास्थळापासुन थोड्या अंतरावर नमुद आरोपी हे गुन्हा करून वेगाने निघुन जाताणाचे अस्पष्ट सी सी टी व्ही फुटेज प्राप्त झाले. सदर अस्पष्ट सी सी टी व्ही फुटेज हे गोपनिय बातमीदार यांना दाखवुन त्याप्रमाणे तपास केला असता. पोलीस अंमलदार/अजय चव्हाण व सपोनि/संजय क्षिरसागर यांना माहीती मिळाली की, सदर तीन आरोपी पैकी एक आरोपी हा पुणे येथील चाफेकर चौक परिसरामध्ये आहे. त्याप्रमाणे दि.२२/०९/२०२६ रोजी सपोनि / संजय क्षिरसागर व त्यांचे पथकाने पुणे येथे जाऊन नमुद संशयीताकडे विचारपुस करता तो विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे दिसून आलेने त्याचेकडे त्याचे पालकासमक्ष चौकशी करता त्याने गुन्हा कबुल केला व त्याचे दोन साथीदार प्रज्वल गवळी व आणखीन एक विधीसंघर्षग्रस्त बालक हे सोलापूर मधील असल्याचे सांगीतले. तसेच पिस्टल व रोख रक्कम त्यांचेकडे असल्याचे सांगीतले. त्यानंतर, दि.23/09/2026 रोजी विधीसंघर्षगस्त बालकाने दिलेल्या माहीती नुसार, गोपनिय बातमीदार यांचे मार्फत माहीती काढुन त्याचे दोन साथीदार प्रज्वल गवळी व विधीसंघर्षग्रस्त बालक यांना बाळे ब्रिज येथुन ताब्यात घेऊन त्यांचेकडुन गुन्हात वापरलेले अॅक्सेस मोटार सायकल, 01 गावठी पिस्टल व 04 जिवंत काडतुसे असा 1,04,000/-रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदर चा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयातील आरोपी नामे प्रज्वल वित्तेश गवळी वय 19 वर्षे, रा. न्यु बुधवार पेठ, सारडा हॉस्पीटल समोर, सम्राट चौक, सोलापूर हा सध्या न्यायालयीन कोठडी मध्ये असुन विधीसंघर्षग्रस्त बालक हे बालसुधारग्रुह येथे आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री विकास देशमुख हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, श्री. एम. राजकुमार, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ), श्री. प्रितम यावलकर, मा. सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ श्री. अरूण देवकर, व.पो.नि.श्री. महादेव राऊत, पो.नि.श्री विकास देशमुख यांचे मागदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटिकरण पथकाचे पथक प्रमूख सपोनि/श्री. संजय क्षिरसागर, पोलीस अंमलदार अजय चव्हाण, महेश शिंदे, कृष्णात बडुरे, विनोद पुजारी, दत्तात्रय कोळवले, विनायक जाधव, रवि धेंडे, विनोद व्हटकर, बसवराज परीट, सुरज सोनवलकर, पंकज घाडगे, कुमार शेळके, शशिकांत दराडे, नितीन मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, तौसीफ शेख, अतिश पाटील, सचिन बाबर, आयाज बागलकोटे, यांनी केली आहे.